solapur

तांबवे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

तांबवे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

संग्रामनगर  (केदार लोहकरे यांजकडून)
तांबवे (ता.माळशिरस) या गावामध्ये हृदय रोगतज्ञ डाॅ.सौरभ गांधी यांचे मोफत हृदय रोग तपासणीचे शिबीर उत्साहात संपन्न.शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त गावातील ग्रामदैवत वज्राई देवी नवरात्र महोत्सव मंडळ,भवानीमाता नवरात्र महोत्सव मंडळ,जय दुर्गादेवी नवरात्र महोत्सव मंडळ व श्री गोरक्षनाथ सामाजिक प्रतिष्ठान तांबवे यांचे संयुक्त विद्यमाने व कै वासुदेव नरहर कुलकर्णी यांचे स्मृतिप्रित्यर्थ तांबवे गावातील विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोरील जि.प शाळेतील या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी डाॅ.सौरभ गांधी यांचेबरोबर स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. सरीता गांधी,डाॅ.फडे,डाॅ.पताळे व त्यांचे सोबत इतर स्टाफ यांनी सदर शिबीर पार पाडण्यास सहकार्य केले.यावेळी गावातील ८० पेक्षा जास्त ग्रामस्थांनी रक्त, बीपी ,कोलेस्टेरॉल व ई सी जी तपासणी करून घेतली.
यावेळी डाॅ.सौरभ गांधी यांचा सत्कार डाॅ.हर्षवर्धन हाके यांनी केला.यावेळेस पी ए सी तांबवे येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.पठाण यांनीही शिबीरात मोलाचा वाटा उचलला.त्याबद्दल त्यांचा सन्मान सिताराम ढोबळे यांनी केला.यावेळी कार्यक्रमाचे संयोजक ॲड.प्रमोद कुलकर्णी यांनी सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या शुभेच्छा देत आपण या गावातील आहोत या मातीशी आपण कांहीतरी देणे लागतो या जाणीवेतूनच या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेचे त्यांनी सांगितले.कै.वासुदेव कुलकर्णी यांनी समाजकार्या बरोबरच सहकारामध्ये कार्याच्या आधारावर त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला होता त्यांनी विझोरीबरोबर अनेक गावातील सोसायटीमध्ये उत्कृष्ट काम केल्याची आठवण करुन देत मागील महिन्यांत तांबवे सोसायटीचे चेअरमन विकास (भाऊ) कोळेकर व तय्यब शेख सर यांचा हृदय विकाराच्या झटक्यात निधन झाले त्यामुळे हृदयाची काळजी अत्यंत महत्वाची असुन यापुढे असे होवू नये म्हणून या शिबीर आयोजन करण्यात आल्याचे ॲड.कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी डाॅ.सौरभ गांधी यांनी हृदयाबाबतची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी दादा महाराज, बाळासो भोसले व ढोबळे,सुर्याजी भोसले,बाळासाहेब जाधव, रिजवाना सिस्टर,कुंभार सिस्टर, सिताराम चंदनशिवे,संजय साठे, रामभाऊ ढोबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी आभार डाॅ पठाण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button