
यशवंतनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी यशवंतनगर येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्रशाळामध्ये महर्षी महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यात शाळेतील जवळ जवळ शंभर टक्के विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवाला.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक सत्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सरपंच वर्षाताई सरतापे,उपसरपंच यशवंतनगर, ग्रामपंचायत सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आणि सदस्य,यशवंतनगर केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ.महादेवी गुंड,सुमित्रानगर शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल नष्टे, केंद्र शाळेतील शिक्षक व तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुलांनी विविध प्रकारची लोकगीते, प्रादेशिक गीते, ऐतिहासिक, चित्रपट गीते,लावणी, भारूड,देशभक्तीपर मुकनाट्य, विडंबन गीते सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.पालकवर्ग आणि ग्रामस्थानी बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांनाच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.अतिशय सुंदर, निसर्गरम्य शालेय परिसर तसेच या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण ठेवल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुबक व आकर्षक झाला.
हा कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बंडू खडतरे,कावेरी नष्टे,अलका भिंगे,विठ्ठल काळे, नवनाथ क्षीरसागर,स्मिता कापसे,मनीषा चोपडे आणि कविता जाधव यांनी परिश्रम घेतले.