educational

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा.

संग्रामनगर दि.१९ (केदार लोहकरे यांजकडून)
बहीण भावाच्या अतूट नात्याची, प्रेमाची जपणूक करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.आज देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो.बहिण भावाचा हा सण लवंग २५/४ येथील फिनिक्स स्कूलच्या चिमुकल्यानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुलींनी स्वतः आपल्या हाताने फुले,लोकर,रेशमी धागे, कापूस,रंगीत तांदूळ,मनी अशा गृहपयोगी वस्तूंचा वापर करून शाळेतील भावांसाठी अतिशय सुंदर मनमोहक अशा राख्या बनवून आपल्या भावाचे तोंड गोड करीत मनगटावर राख्या बांधल्या तर भावांनीही आपल्या बहिणींसाठी चॉकलेट्स,पेन्सिल, पेन,बांगड्या,टिकली पॉकेट देऊन भावाचे कर्तव्य बजावण्याची परंपरा जोपासली.


या उपक्रमामुळे मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. कार्यानुभव अंतर्गत मुलींच्या कलेला संधी मिळाला आहे.मुलींनी स्वतः राख्या बनविल्यामुळे आज मुलींच्या चहे-यावर आनंद वेगळाच होता हा उपक्रम राबविण्यासाठी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका,अध्यक्षा नूरजहाँ शेख,गुलशन शेख यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button