भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
संचार वृत्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी (कॉम्प्युटर टायपिंग स्पीड) परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत यशाची दैदीप्यमान परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादीत केले आहे.या परीक्षेमध्ये या संस्थेतील कु. ओवाळ किरण रवींद्र आणि कु. साखरे स्नेहा राजेंद्र या दोघी विद्यार्थिनींनी कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा जीसीसी-टीबीसी इंग्रजी ३० श.प्र.मि. या विषयात ९७% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये विभागून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला, तर कु.ओवाळ किरण रविंद्र हिने इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात ९४.५% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला.जीसीसी-टीबीसी जून २०२४ परीक्षेत विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
इंग्रजी ३० श.प्र.मि. या विषयात :- कु.ओवाळ किरण रविंद्र आणि साखरे स्नेहा राजेंद्र ९७% विभागून प्रथम, जाधव अश्विनी लक्ष्मण ९२.५% द्वितीय, कटके ज्ञानेश किशोर आणि माने सुप्रिया दादा ९२% विभागून तृतीय.
इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात :- कु.ओवाळ किरण रविंद्र ९४.५% गुण प्राप्त करत संस्थेत प्रथम, माने प्रदीप लक्ष्मण ९२% द्वितीय, साळुंखे पूजा नवनाथ ८६.५% तृतीय.मराठी ३० श.प्र.मि. या विषयात :- कटके ज्ञानेश किशोर ९३.५% प्रथम, कु.ओवाळ किरण रविंद्र ९३% द्वितीय, कांबळे मनोज उज्वल ९२% तृतीय, असे गुण प्राप्त करत या सर्वांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सय्यद सोफिया हासिम हिने इंग्रजी ३० स्पीड परीक्षेत, तर राऊत वैष्णवी सिद्धलिंग व तोरणे कपिल आनंद यांनी मराठी ३० स्पीड परीक्षेत ९०.५%, सोनवणे अतुल वसंत याने मराठी ३० मध्ये ९०% व बनपट्टे विशाल सूर्यकांत याने मराठी ४० मध्ये ८८.५% गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत शासकीय, निम-शासकीय विभागातील लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी- टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिट या विषयांचे कोर्सेस चालविले जात असून वर्षभरातून दोनदा या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा पास झालेले विद्यार्थी सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे आदी विभागातील लिपिक पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात.
जून २०२४ मधील जीसीसी-टीबीसी (कॉम्प्युटर टायपिंग) परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ सर, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, ज्ञानदीप जवंजाळ सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त करत उत्तीर्ण झालेल्या र्विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून भक्ती संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.