सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद

सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या
प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद
संचार वृत्त अपडेट
भाजपने राज्यात केलेला विकास हा आपण सर्वजण पहात असून अनुभवत आहात त्यामुळे येत्या काळातही आपल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास केवळ भाजपच करू शकेल त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता भाजपला साथ द्या असे आव्हान संग्राम नगर पं.स.गणाचे उमेदवार राजेश्वरी माने पाटील यांनी प्रचारा दरम्यान केले.
यावेळी संबोधित करताना मा.सभापती राजलक्ष्मी माने पाटील म्हणाल्या केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी युवक,महिला आणि नागरिकांसाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजना केवळ कागदावर न राहता त्या ताळागाळातील गरजूपर्यंत प्रभावीपणे भाजपने पोहोचवल्या आहेत संग्रामनगर जि.प.गट उमेदवार मेघा कचरे यांनाही भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून या गटातील व गणातील मूलभूत सुविधांना गतीदेण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देणे काळाची गरज आहे असे भाजप नेत्या ज्योतीताई माने पाटील यांनी ठामपणे सांगितले.वृषाली माने पाटील म्हणाल्या.या गटातील जनता घराणेशाहीच्या उमेदवारांना योग्य जागा दाखवतील व भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करतील.
संग्रामनगर पं.स. उमेदवार राजेश्वरी माने पाटील व जि.प. उमेदवार मेघा कचरे यांच्या प्रचारार्थ संग्राम नगर येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मतदारांचा प्रतिसाद मिळाला प्रचंड मतांनी विजयी होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. असा विश्वास भाजपचे उमेदवार व्यक्त करत आहेत. प्रचारा निमित्त मतदारांच्या गाठीभेटी दरम्यान ते बोलत होते. लोकांनी आपल्यातील वैर बाजूला ठेवत भाजपच्या उमेदवारांना उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा जंग बांधला आहे. मतदारांच्या गाठीभेटींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आपल्यातील मतभेद विसरून भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावागावातून मिळत असलेला प्रतिसाद बघून भाजपचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार यात शंका नाही.असे मत कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.



