solapur

माळीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे;राजेंद्र गिरमे

माळीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे;राजेंद्र गिरमे

संचार वृत्त अपडेट

माळीनगर (ता.माळशिरस) येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.माळीनगर कारखान्याचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अमित टिळेकर,डॉ.प्रवीण पताळे आणि उमेदवार नागेश तूपसौंदर्य, विजय खंडागळे आणि ऋतुजा विक्रम पराडे आदी उपस्थित होते.


यावेळी रंजनभाऊ गिरमे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील अशा प्रकारे पक्षाचा प्रचार करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून त्यांनी प्रचारांची प्रचाराच्या शुभारंभ केला.व उमेदवारांना निवडून देण्याचे आव्हान केले.अमित टिळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केली तसेच यावेळी यावेळी खंडाळी गावचे माजी सरपंच बाबुराव पताळे यांची चिरंजीव अमोल पताळे,सुभाष गोसावी राहुल रोकडे उपस्थित होते त्यांनी सांगितले की माळीनगरमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त जास्त मताधिक्याने निवडून देऊ.असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महादेव कावळे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button