solapur

भाजप उमेदवारांचा विजय निश्चित विरोधकांचा दावा खोटा ठरणार ; अँड.रविंद्र जाधव

भाजप उमेदवारांचा विजय निश्चित विरोधकांचा दावा खोटा ठरणार ; अँड.रविंद्र जाधव

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यात भाजपाचे जि.प.चे पं.स.चे सर्व ऊमेदवार विजयी होवुन तालुक्यातील आमदार ,खासदार यांनी मांडलेले नऊ /आकरा-शुन्य हे गणित चुकणार असुन केलेला विजयाचा दावा भाजपा खोटा ठरवेल असा विश्वास अँड.रविंद्र जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
माळशिरस तालुक्यात जि.प.व पं.समिती निवडणुकीत राष्ट्रवादीसह सर्व पक्ष मिळुन भाजपाचा सुपडा साफ करणार असे विधान खा.मोहिते पाटील आणि आ.ऊत्तमराव जानकर यांनी केले होते.त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे अँड.रविंद्र जाधव यांनी त्यांचा दावा खोटा ठरवत या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, संग्रामनगर गटातुन निवडणूक लढवित असलेल्या उमेदवार मेघा कचरे व पं.समिती गणातील राजेश्वरी माने पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.मतदारांचा ऊस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरीकांना व लाडक्या बहिणींना अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ होत आहे.
नागरीकांना भाजपच्या विकासावर विश्वास असल्याने या निवडणुकीत भाजप सर्वात म़ठा पक्ष ठरेल.तृयाच बरोबर आगामी निवडणुकीत ही भाजप मोहिते पाटलांचा गड असलेल्या यशवंतनगर ग्रामपंचायत निवडणुकीत ही यश मिळवेल असे ही सांगितले.
यावेळी त्याचे सोबत हंसराज माने पाटील,भाजप उमेदवार राजेश्वरी माने पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button