solapur

ग्राहकाचा विसरलेला मोबाईल पेपर विक्रेता महेश कुलकर्णी यांनी प्रामाणिकपणे केला परत

ग्राहकाचा विसरलेला मोबाईल पेपर विक्रेता महेश कुलकर्णी यांनी प्रामाणिकपणे केला परत

संचार वृत्त अपडेट 

आजच्या धाकधुकीच्या आणि धावपळीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झाला आहे की जवळच्या मित्राला अथवा नातेवाईकाला बोलायला सुद्धा वेळ नसतो वेळप्रसंगी आपली साहित्य किंवा वस्तू कोठे विसरले आहे याचेही भान राहात नाही असाच एक प्रकार अकलूज बस स्थानकावर घडला बाळासाहेब कांबळे नामक व्यक्ती आपल्या भगिनीला सोडायला अकलूज बस स्थानकावर आला होता भगिनीला बस मध्ये बसवल्यानंतर त्याने तिथेच असलेल्या वर्तमानपत्र खरेदी केले. आणि स्वतःचा मोबाईल तेथेच विसरून गेले त्याच दरम्यान बाळासाहेब कांबळे यांच्या मोबाईलवर त्यांच्याच मुलीचा कॉल आला तो कॉल स्टॉल मध्ये असलेले महेश कुलकर्णी यांनी तो कॉल रिसीव करून सांगितले की हा फोन पेपर स्टॉलवर विसरलेला आहे. त्यानंतर कांबळे यांच्या मुलीने संपर्क साधून वडिलांना सांगितले की तुमचा मोबाईल बस स्थानकावरील पेपर स्टॉलवर विसरला आहे किमान एक तासानंतर बाळासाहेब कांबळे हे बस स्थानकावरील पेपर स्टॉलवर गेले त्यावेळी महेश कुलकर्णी यांनी प्रामाणिकपणाने किमान 25 हजार रुपयांचा मोबाईल त्यांना परत केला आजही जगात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं महेश कुलकर्णी यांच्या या प्रामाणिकपणामुळे दिसून येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button