solapur

युवा नेते राहुल ढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना फळे वाटप.

युवा नेते राहुल ढेरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना फळे वाटप.

संचार वृत्त अपडेट 

अकलूज  (प्रतिनिधी)
माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे अकलूज शहर कार्याध्यक्ष,युवा नेते राहूल ढेरे यांचा ४५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी काॅंग्रस अजित पवार गटचे अकलूज शहराध्यक्ष राजीव गायकवाड यांच्या वतीने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयातील गोरगरीब, माता,भगिनी यांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख व सोलापूर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सदस्य अशोकदादा गायकवाड यांच्या शुभहस्ते रूग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुडे,डॉ.गिरीश शिंदे, डॉ.ओव्हाळ,तालुक्याचे माजी कृषी अधिकारी अरविंद पगारे, माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पैलवान जाधव, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते भिमराव भुसनर,नानासाहेब चव्हाण,कल्याण सरगर,सागर वाघमोडे,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button