solapur

श्रीपुर मध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास अडचणी येतात त्यामुळे पंढरपूर तालुक्यात जागा बघून ठेवली आहे

श्रीपूर मध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास अडचणी येतात त्यामुळे पंढरपूर तालुक्यात जागा बघून ठेवली आहे;व्हा चेअरमन कैलास खुळे

श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)

  • श्रीपूर मध्ये कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना चालविण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे पंढरपूर तालुक्यात जागा बघून ठेवली आहे अशी माहिती कारखान्याचे व्हा चेअरमन कैलास खुळे यांनी दिली आहे आज सकाळी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळावर चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत क्रिडा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात व्हा चेअरमन यांनी सदर वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्या या अचानक खळबळजनक वक्तव्याने कामगार अधिकारी व श्रीपूर मधील नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे
    गेली तीस ते बत्तीस वर्षे श्रीपूर मध्ये हा सहकारी साखर कारखाना दृतगतीने वाटचाल व यशाच्या शिखरावर अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त आहे कारखान्याचे संचालक मंडळ व्यवस्थापन स्थानिक वातावरण पहिल्या पासून सलोखा एकोपा निर्माण करणारे राहिले आहे त्यामुळे या कारखान्यात स्थानिक पातळीवर राजकारण मतभिन्नता कटुता आलेली नाही कारखान्याचे विस्तारीकरण गाळप क्षमता वाढवून अनेक नवीन तंत्रज्ञान युक्त प्रकल्प उपक्रम यशस्वीपणे राबवून कारखाना प्रगतीपथावर आहे कारखान्याचे विस्तारीकरण बरोबरच कारखान्यानची स्थावर मालमत्ता केली आहे श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक यांनी शेतकरी सभासद कामगार यांवर पुरक व्यवसाय उत्पादक संस्था यांना मदतीचा हात देऊन सहकार समृद्ध केला आहे या कारखान्यावर इथला परिसर इथले लहान मोठे व्यवसाय धंदे व्यापार परस्पर एकमेकांवर अवलंबून आहेत आज अचानक व्हा चेअरमन कैलास खुळे यांनी त्यांच्या मनोगतात जे सुतोवाच केले आहे त्यामुळे नक्की व्यवस्थापन यांची भूमिका काय या बाबत या परिसरात चर्चेला उधाण आले आहे या पार्श्वभूमीवर अनेकदा ऊस वहातुक लांब पडते वहातुक खर्च वाढतो याचेवर बोललं गेल आहे तरीही त्यावेळी संचालक मंडळ व्यवस्थापन यांनी स्थलांतर बाबत कधी जाहीर केल्याचे ऐकिवात नाही कारखान्याचे विभागीय कार्यालय पंढरपूर तालुक्यात वाखरी येथे सुरू केले आहे तेथे सभासदांना त्यांची कामे करण्यासाठी कार्यकारी संचालक आठवड्यातून दोन ते तीन दिवस त्या कार्यालयात उपलब्ध होतात या सर्व पार्श्वभूमीवर शेवटी कारखान्याचे संचालक मंडळ व्यवस्थापन यांचा अंतिम निर्णय व त्यांना अधीकार आहे स्थानिक वातावरण पंढरपूर मंगळवेढा येथील राजकीय सामाजिक परिस्थिती व सोयीचं राजकारण यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button