स्मार्ट मीटर सक्ती विरोधात धरणे आंदोलन

स्मार्ट मीटर सक्ती विरोधात धरणे आंदोलन
संचार वृत्त अपडेट
वेळापूर येथील महावितरण कार्यालयासमोर ग्राहकांच्या संमतीविना स्मार्ट मीटर बसवू नयेत या मागणीसाठी किरण भांगे,किशोरराजे गाडे-पाटील,लखन शेंडगे,रोहित काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले .
यावेळी वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख नितीन वाघमारे,रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष राहुल बिडवे,लहुजी शक्ती सेनेचे केशवराव लोखंडे,जय मल्हार क्रांती संघटनेचे काकासाहेब जाधव,मदनसिंह जाधव,राजरत्न बापू नाईकनवरे,शैलेश जाधव,नाभिक संघटनेचे राहुल सराटे,संदीप लांडगे,राष्ट्रवादी(श.प)ओबीसी सेलचे उपाध्यक्ष शिवम काशीद,प्रदीप सरवदे,पिनू येडगे,बोंडले गावचे उपसरपंच ज्योतीराम चव्हाण इ.मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
वीज नियामक कायदा-2003 अधिनियम 47 (5)नुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचे अधिकार असून ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसू नये व याबाबत जनतेने सुद्धा सतर्क राहून आपली फसवणूक होत असल्यास तक्रार करावी असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य किरण भांगे यांनी केले.
यावेळी सत्यम काळे,योगेश जाधव,विठ्ठल जाधव,आजिनाथ वाघमारे,सोमनाथ सपकाळ,गणेश चव्हाण,सुरज गाडे,चेतन माने,विकी लंगडे,ज्ञानेश्वर डिंगणे,प्रज्वल काळे,मोहन बनसोडे,रणजीत मांडवे,शिवा भांगे,गोविंद भांगे,धीरज काळे,कन्हैया चौधरी,गणेश शिंदे,बापूराव बोडरे,नाना भांगे,शंकर जाधव,संतोष काशीद, प्रशांत गवळी,अजिनाथ सूरवसे,आबासाहेब वाघमारे,इ.सह क्रांतीमिञ सामाजिक संस्थेचे असंख्य सदस्य उपस्थित होते.