solapur
प्रा.अल्लाबक्ष मुलाणी यांची श्री ज्ञानेश्वर विद्यालय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन पदी निवड

अल्लाबक्ष मुलाणी यांची श्री ज्ञानेश्वर विद्यालय प्प्रा. अल्लाबक्ष मुलाणी यांची श्री ज्ञानेश्वर विद्यालय कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन पदी निवड
संचार वृत्त अपडेट
आळंदी येथील श्री. ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व नेपाळ काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण पुरस्काराने सन्मानित प्रा.अल्लाबक्ष मुलाणी यांची श्री ज्ञानेश्वर स्थानिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर संस्था सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलाणी सरांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.



