माळशिरस तालुक्यात कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर , नेमकं काय घडतंय

माळशिरस तालुक्यात कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर, नेमकं काय घडतंय
संचार वृत्त अपडेट
त्यानंतर आज माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच माजी आमदार राम सातपुते हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. होलार समाजाच्या कार्यक्रमानिमित्ताने ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात अनेक भाष्य करुन राजकीय वातावरण गरम झाले होते. त्याचबरोबर आगामी काळात राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता या निवडणुका पार पाडण्याचे आदेश सर्व आमदार खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळेच या ठिकाणी कार्यक्रमाला हे तिन्ही आमदार एकत्र पाहायला मिळाल्याची चर्चा सुरु आहे.
माजी आमदार राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर केले होते आरोप
विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहित पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपविरोधात काम केल्याचा आरोप राम सातपुते यांनी लावला होता. पक्षाच्या पराभवासाठी मोहिते पाटील यांनी पैसे वाटल्याचे देखील सातपुते यांनी म्हटलं होतं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी. असा घणाघाती आरोप करत राम सातपुते यांनी विधान परिषदेचे आमदार रणजित मोहिते यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
माळशिरस विधानसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आपला पराभव मान्य करत पराभवाचे खापर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडले होते. त्यांनी भाजप विरोधात काम केलं, पैसे वाटल्याचे ते म्हणाले होते. तसे रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी देखील राम सातपुते यांनी केली होती.