कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापने करिता मुख्यमंत्री यांचेकडे लवकरच पाठपुरावा करू – आ.राजेश क्षीरसागर.

कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापने करिता मुख्यमंत्री यांचेकडे लवकरच पाठपुरावा करू – आ.राजेश क्षीरसागर.
संचार वृत्त अपडेट
अकलूज (प्रतिनिधी)
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ.राजेश क्षीरसागर यांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्य यांनी आज आज सर्किट हाऊस येथे भेट घेऊन आ.राजेश क्षीरसागर यांना सर्किट बेंच बाबत पाठपुरावा करणे बाबत विनंती केली.यावेळी नूतन अध्यक्ष ॲड.व्ही.आर.पाटील यांचे वतीने आ.क्षीरसागर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ वकील व बार कौन्सिल चे माजी चेअरमन ॲड.महादेवराव अडगुळे हजर होते.
सर्किट बेंचबाबत राज्य शासनाने मा.मुख्य न्यायाधीश साहेब यांचेकडे प्रस्ताव पाठवावा यासाठी पाठपुरावा करणे बाबत आ.क्षीरसागर यांना विनंती केली, तसेच न्यायालय आवारातील कार पार्किंगसाठी शेड बांधणे, महिला विभागासाठी संगणक मिळावेत व न्यायालय आवारातील खराब रस्त्याची दुरुस्ती करणेबाबत सूचना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली.त्यावर आमदार यांनी संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना देऊन ही कामे मार्गी लावणेबाबत सूचना दिल्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असो अध्यक्ष ॲड.व्हि.आर. पाटील,सचिव ॲड.मनोज पाटील,सहसचिव ॲड.सूरज भोसले,महिला प्रतिनिधी ॲड. मनीषा सातपुते सदस्य ॲड.मीना पाटोळे,ॲड.सम्राज्ञी शेळके, ॲड.वैष्णवी कुलकर्णी,ॲड. स्नेहल गुरव ॲड.निखिल मुदगल हजर होते