संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार पायी पालखी सोहळ्याचे अकलूज येथे भव्य स्वागत

संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार पायी पालखी सोहळ्याचे अकलूज येथे भव्य स्वागत
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे)
श्री संत श्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार पायी दिंडी सोहळा आज अकलूज येथे पोहोचला यावेळी अकलूज कुंभार समाजाच्या वतीने कुंभार समाजाचे अध्यक्ष अमित सुरेश कुंभार,संदीप वसंतराव कुंभार,सुधाकर कुंभार, रवी कुंभार ,राहुल कुंभार, विनायक कुंभार,कुंभार समाजातील महिलांनी व नागरिकांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून आश्वाचे पूजन केले व पालखीतील पादुकांचे विविध पूजन करून दिंडी चालकांचा सत्कार केले व प्रसादाचे वाटप करण्यात आले संत गोरोबाकाका पायी दिंडी सोहळा हा राजगड पायथा गुंजवणी येथून गेले वीस वर्षापासून सुरू झाला आहे २० जून रोजी हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
आज अकलूज येथे मुक्काम व पुढे बोरगाव,श्रीपुर,माळखंबी,तोंडली बोडले मार्गे पंढरपूरकडे जाते.या सोहळ्याचे अध्यक्ष तानाजी शिंदे, माणिक आबा टाकळीकर, विणावादक सुरेश रसाळ,चोपदार तुकाराम झांजे,जबाबदार राजाभाऊ कुंभार,बैल मालक बोरकर,घोडे मालक मानकर नारायणपूर त्याचबरोबर पालखी पुढे दोन व पाठीमागे दोन दिंड्या चालत आहेत सुमारे ६०० ते ८०० भाविक या दिंडी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत.