स्वभिमानी केसरी बैलगाडा स्पर्धेचा थरार घार्निगीकर,भवरकरांचा राजा व चित्र्या प्रथम

स्वभिमानी केसरी बैलगाडा स्पर्धेचा थरार घार्निगीकर,भवरकरांचा राजा व चित्र्या प्रथम
संचार वृत्त अपडेट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या वतीने निमगाव पाटी, विझोरी येथे “स्वाभिमानी केसरी 2025 खुल्या बैलगाडा स्पर्धेचे आयोजन रविवार दि 18 मे रोजी करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष , मा खा राजु शेट्टी ,खा धैर्यशिल मोहिते – पाटील ,आ उत्तम जानकर, यांच्या हस्ते करण्यात आले काय घेतले यावेळी अर्जुनसिंह मोहिते पाटील, ॲड सोमनाथ वाघमोडे , किशोर सुळ ,जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, के. पी काळे, सचिन पाटील, शिवाजीराव पाटील, नामदेव वाघमारे, तुकाराम देशमुख, युवराज घुले ,पांडूरंग वाघमोडे, सुरेश टेळे, दादासाहेब घाडगे, पं स अजय सकट, सचिन वावरे , मगन काळे , डॉ सचिन शेंडगे ,सचिन पिसे आदी मान्यवर उपस्थित होते
स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत आसणारे बकासूर ,चित्र्या, अर्जुन राजा ,चित्या ,चिमण्या ,शंभु, बाजिंदा, या बैल सह बैलगाडा मालक ,चालक ,शर्यत प्रेमी, बहुसंख्येने उपस्थित होते शर्यतीचे समालोचन सुनिल मोरे पेंडगावकर व संपत वाघमोडे यांनी केले तर झेंडा पंच म्हणून पप्पु मंडले पप्पू पेंडगांवकर काम पहिले या मैदानात बैलगाडा मालक व शैकीनांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्यासाठी थंड पाणी पशुधनाच्या आरोग्या काळजी करीता ॲम्बुलेन्स सुविधा दिवसभर मैदानात करण्यात आली होती स्पर्धेत जवळपास 300 सत्तर बैलगाडा स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला सेमी फायनला पास करणाऱ्या गाडीला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पी थ्री लाईव यांनी केले मैदान पाहण्यासाठी हाजारोंच्या संख्येने बैलगाडा शर्यत प्रेमी उपस्थित होते या स्पर्धेत घार्निगीकर व भवरकरांचा राजा व चित्र्या प्रथम ,तर उर्मिला गायकवाडांचा व वाघोलीकरांचा अर्जुन व चिमण्या द्वितीया मानकरी ठरले विजेत्या बैलगाडा स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम समारंभपूर्वक देण्यात आले यावेळी विजेत्या बैलगाडा स्पर्धकांनी एकच जल्लोष केला
निमगाव पाटी, विझोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या बैलगाडा स्पर्धेत बक्षीस वितरण करताना अजित बोरकर, ॲड सोमनाथ वाघमोडे, किशोर सुळ, बाळासाहेब सरगर,के पी काळे,सचिन पिसे,डॉ.सचिन शेंडगे,आदी मान्यवर उपस्थित होते.