solapur

महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला येथे विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा संपन्न

महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला येथे विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा संपन्न

संचार वृत्त अपडेट 

प्रिय अशी हि माझी शाळा

तिच्यावर मी काय लिहावे

महती तिची गाता गाता

शब्दांनीही कमी पड़ावे

आपली शाळा सगळ्यांना एकदम प्रिय असते शाळा म्हणजे फक्त भिती नसुन ती
आपली माय असते. आपल्या शाळेच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर च्या इयता दहावी २००५ बॅच ने आपले माजी विध्यार्थी स्नेह संमेलन रविवार महर्षी प्रशालेत आयोजित केले होते .

यावेळी २००५ ची बँच मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व ५७ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उपस्थित होते.

सर्वप्रथम सर्व विद्यार्थी महर्षी प्रशालेच्या मैदानावर उपस्थित झाले त्यानंतर रस्सीखेच कार्यक्रम झाला त्यानंतर शाळेची बेल वाजवण्यात आली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वर्गात उपस्थित झाले तिथे राष्ट्रगीत प्रार्थना झाली व या ठिकाणी महर्षि प्रशाला शाळेसाठी २ प्रोजेक्टर भेट म्हणून दिले. त्याच बरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर येथील पालवी या एड्स बाधित मुलांच्या संस्थेला शाळेतील विध्यार्थ्यांना दैनंदीन शिक्षणामध्ये मदत व्हावी म्हणून फर्निचर व स्टेशनरी स्वरूपात मदत केली.याप्रसंगी २००५ बँचचे मुख्याध्यापक खताळ सर सोबत बॅचचे इतर १२ शिक्षक उपस्थित होते या सर्व गुरुजनांचा यथोचित सन्मान २००५ बँच च्या विध्याथ््यानी केला व त्यांच्याप्रती सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व आपण सध्या काय करत आहे याची माहिती दिली . ही माहिती देताना सर्व विद्यार्थी खूप आनंदात होते

दिवसभर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम,संगित खुर्ची फनी गेम्स या माध्यमातून माजी विद्यार्थी – विद्यार्थीनींनी
आपल्या शाळेतील मौज मजा आपल्या सर्व मित्र मैत्रिणीसोबत २० वर्षा नंतर परत एकदा अनुभवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button