solapur

प्रभारी मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी सेवेतून निलंबित

प्रभारी मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी सेवेतून निलंबित

संचार वृत्त अपडेट 

 मौजे लवंग (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील गट क्र. 282/1/आ/2 क्षेत्रातील फेरफार नोंदी प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आले असून महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर गट क्रमांकातील क्षेत्र उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलूज यांनी वाणिज्य प्रयोजनार्थ (हॉटेल व इतर व्यापारी उपयोगासाठी) विकास परवानगी आदेश दिलेला असताना, खरेदी दस्तानाच्या अनुषंगाने गाव दप्तरातील फेरफार नोंदी 2024 मध्ये तत्कालीन मंडल अधिकाऱ्यांनी नामंजूर केल्या होत्या.

मात्र, त्यानंतर प्रभारी मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मनीषा लकडे यांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे आदेश नसतानाही स्वतःच्या पद्धतीने दुबार नोंदी एकाच दिवशी पूर्वपरवानगीशिवाय प्रमाणित केल्याचे निष्पन्न झाले.

याचप्रमाणे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती कविता बरडे यांनीसुद्धा संबंधित जमिनीच्या फेरफार नोंदी वाणिज्य प्रयोजनार्थ परवानगी असतानाही खरेदी दस्ताऐवज व इतर फेरफार नोंदी परस्पर नामंजूर केल्याने गंभीर अनियमितता घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोन्ही प्रकरणांवर उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी विभागीय चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी कठोर कारवाई करत दिनांक 8 सप्टेंबर 2025 पासून श्रीमती मनीषा लकडे (प्रभारी मंडल अधिकारी) व श्रीमती कविता बरडे (ग्राम महसूल अधिकारी) यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

लवंग प्रकरणामुळे माळशिरस तालुक्यातील इतर ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यांची सुद्धा विभागीय चौकशी व दफ्तरे तपासली जातील का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button