solapur

गस्तपथक वृत्ताची दखल स्मशानभूमी दरवाजा पर्यंत रस्त्याचे काम सुरू केले

गस्तपथक वृत्ताची दखल स्मशानभूमी दरवाजा पर्यंत रस्त्याचे काम सुरू केले

संचार वृत्त अपडेट 

श्रीपूर–महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे वतीने गस्तपथक वृत्ताची दखल घेतली असून श्रीपूर येथील स्मशानभूमी दरवाजा पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे नगरपंचायतचे आभार स्थानिक नागरिकांनी मानले आहेत गेल्या आठवड्यात या बाबतचे वृत्त सोशल मीडिया वर गस्तपथक मध्ये व्हायरल झाले होते सुमारे सव्वाशे मीटर अलिकडेच स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले होते सदर रस्ता स्मशानभूमी दरवाजा पर्यंत करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती तशा आशयाचे वृत्त देण्यात आले होते महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांचेकडे सदर वृत्त देण्यात आले त्यांनी वर्क फ्रॉम आर्डर मध्ये सव्वाशे मीटर रस्ता मंजूर करून संबंधित ठेकेदार यांना स्मशानभूमी दरवाजा पर्यंत रस्ता करण्याचे सांगितले त्यामुळे आता सदर काम त्यानुसार सुरू झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button