निरा देवधर प्रकल्प 30 वर्षापासून रखडला प्रत्येक निवडणुकीत लाभार्थींना गाजर

निरा देवधर प्रकल्प 30 वर्षापासून रखडला प्रत्येक निवडणुकीत लाभार्थींना गाजर
संचार वृत्त अपडेट
माळशिरस तालुक्यातील २२ गावांसाठी नीरा देवघर धरणाचे पाणी आणणे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आता राजकीय कळीच्या व श्रेय वादाचा ठरत आहे. वास्तविक या प्रकल्पासाठी दोन्ही गटाकडून शक्य ते प्रयत्न केले गेले असताना आता या मागणीसाठी सत्ताधारी आमदार, खासदारांनी रविवारी केलेल्या रस्ता रोको आंदोलनात मटणाचे जेवण दिल्याचा विरोधकांकडून आरोप होत असून श्रेयवाद पुढे येताना दिसत आहे.
भोर तालुक्यातील देवघर येथे नीरा नदीवरील हा प्रकल्प १९९५ च्या सुमारास पूर्ण झाला. याच्या प्रकल्प
प्रस्तावात माळशिरस तालुक्याचे नाव नसल्याने त्यावेळी उपमंत्री म्हणून नव्यानेच सत्तेत गेलेल्या मोहिते पाटील यांनी हट्ट करून ही २२ गावे या प्रकल्पात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पाटबंधारे मंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडून समाविष्ट करून घेतली. मात्र पुढे मराठवाडा अनुषेशामुळे पुढील कामासाठी सन २०१४ पर्यंत निधी मिळाला नाही. व तेथून पुढे सत्तेचे हस्तांतर झाले, असे मोहिते पाटील गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र तेव्हापासून या भागाला प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गटाकडून या प्रकल्पाचे गाजर दाखवण्यात येत आहे. सन २०१९ मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार असताना
मोहिते पाटील ही भाजपात होते. त्या ५ वर्षांच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे काम लवकरच बंदिस्त पाइपलाईनद्वारे करणार असल्याची घोषणा केली होती. खा. निंबाळकर यांनीही अनेकदा या कामाच्या निविदा निघाल्या आहेत, कामे लवकरच सुरू होतील. अमुक ठिकाणी सुरू झाली आहेत, असे सांगण्यात आले होते.
शासनाला दिलेल्या मुदतीतील ५० दिवस संपल्याची आठवण करून देण्यासाठी आमदार व खासदार यांनी रविवारी दि.७ रोजी गारवाड चौकात रस्ता रोको आंदोलन व सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी मागील काळात या कामात काही प्रगती झाली नाही, त्यांनी पाठपुरावा केला
यांनी त्यांनी केलेल्या काही पत्रव्यवहार व त्याची उत्तरे नसल्याने हा प्रकल्प रेंगाळल्याचे सांगत खा. धैर्यशील मोहिते पाटील आंदोलकांना वाचून दाखवली
मात्र त्यानंतर भाजपचे बाळासाहेब सरगर, शिवराज पुकळे यांनी मोहिते पाटील यांनी यात राजकारण आणू नये ही कामे अगोदरच माजी खा. निंबाळकर व माजी आ. राम सातपुते यांनी केली असल्याचे सोशल मीडियावर प्रसारित करणे सुरू केले आहे. तर काहींनी या आंदोलनाला लोक जमा जमा करण्यासाठी आमदार जानकर यांनी मटणाचे जेवण दिल्याचा आरोप केला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना टीका केली.माध्यमांशी बोलताना पाणी प्रश्नांविषयी किती आत्मीयता आहे हे दिसते म्हणत अर्थात तो त्यांचा अधिकार असल्याची टीका करण्यात आली आहे.
डोंगर दऱ्यातील, धनाजी संतार्जीच्या इलाख्यातील हे लोक आहेत. ते वाघाच्या शिकारी करून वाघाचे मटण खाणारे तर वाघिणीचे दूध पिणारे हे लोक आंदोलनात होते. सरकारच्या विरोधात आवाज उठवताना बळ पाहिजे म्हणून त्यांनी मटण खाल्ले तर बिघडले कुठे.
उत्तमराव जानकर, आमदार



