कर्णकर्कश (फटाका बुलेट) बुलेट स्वारांनो सावधान आवाज काढाल तर जप्त करून आवर घालणार ; निरज उबाळे,पो.नि.

कर्णकर्कश (फटाका बुलेट) बुलेट स्वारांनो सावधान आवाज काढाल तर जप्त करून आवर घालणार ; निरज उबाळे,पो.नि.
संचार वृत्त अपडेट
अकलूज शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कांटाळया बसविणाऱ्या आवाजा द्वारे शहरवासी यांना तसेच ग्रामस्थांना त्रस्त करून सोडणाऱ्या बुलेट स्वारांना शहर पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकाकडून करण्यात आली आहे निरज उबाळे पो.नि.व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मोहीम उघडून बुलेट स्वारावर व अवैध नंबर प्लेटवर कारवाई करावी विशेष म्हणजे महाविद्यालय,कोचिंग क्लासेस, या ठिकाणी विद्यार्थिनींचे छेड काढण्यासाठी या रोड रोमिओ चा वावर मोठ्या प्रमाणावर असतो दुचाकीच्या स्ट्रोक चा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी सायलेन्सर चा वापर केला जातो. येथे मात्र सायलेन्सर ची व्याख्याच काही बुलेट स्वारांनी बदलून टाकली आहे कर्कश आवाज करणारी यंत्रणा असलेल्या विशिष्ट सायलेन्सर चा वापर करून बुलेट स्वार रस्त्यावर रात्री बे रात्री फिरत असतात फटाके फुटल्यासारखे आवाज करीत असल्याने या बुलेटला ‘फटाका बुलेट’ असेही म्हटले जाते विद्यार्थिनी मागे फिरणारे रोड रोमिओ,टवाळखोर,समाजकंटक, मद्यपी युवक अकारण प्रचंड वेगाने बुलेट पळविणारे हौशी तरुण यांचा मोठा उपद्रव शहरात होत आहे रात्री बे रात्री शहरातील कॉलनी परिषद आणि प्रमुख रस्त्यावरून फिरणाऱ्या बुलेटमुळे शांतता भंग होऊन ध्वनी प्रदूषण होते व वयोवृद्ध नागरिकांत घबराट होत आहे नागरिकांना त्याचा त्रास वाढला आहे त्यामुळे काही नागरिकांनी पत्रकाराशी याबाबत संपर्क साधून या विषयावर संबंधिताचे लक्ष वेधण्याची मागणी केली.नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गांभीर्याने दखल घेऊन पो.नि. निरज उबाळे यांनी संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे अनेक विद्यार्थी हे बुलेट गाडीचे फटाके काढण्यात धन्यता मानत आहेत यामध्ये बुलेट सारख्या 350/500 सीसी पॉवरच्या गाडीचे चालू इंजिन एका सेकंदाच्या आत बंद करून परत चालू केले जाते की जेणेकरून या प्रोसेसमुळे इंजन मधून खूप मोठा फटाका फुटल्यासारखा आवाज येतो त्यामुळे हे मुलांच्या मुलींच्या शेजारून जाताना वारंवार केले जाते परंतु हे करताना ईतर मुलांना तर त्रास होतोच परंतु इंजिनमध्ये बिघाड होऊन अपघात होण्याची ही दाट शक्यता असते.
सहकारी व सहाय्यक निरीक्षक,दामिनी पथक आणि शोधपतकाला सोबत घेऊन अशा ‘फटाका बुलेट’ जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करून योग्य ती कडक कारवाई करणार व संबंधितावर तात्काळ कारवाईचे आदेश देऊन नाकाबंदी करून पोलीस प्रशासनाला सक्रिय करणार तसेच पालकांनाही पाल्य चुकीच्या मार्गाने तर जात नाही ना याकडेही पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
निरज उबाळे
पो.नि.अकलूज



