उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मारुती अंबोरे यांचा शिवसेनेमध्ये मातोश्री वरती प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मारुती अंबोरे यांचा शिवसेनेमध्ये मातोश्री वरती प्रवेश
संचार वृत्त अपडेट
महाराष्ट्र राज्य जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती भाऊ अंबुरे पाटील यांचा मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला, 1986 साली मारुती अंबुरे शिवसेना पक्षाचे अकलूज शहर प्रमुख होते, त्या काळात त्यांचा माळशिरस तालुक्यात शिवसैनिक म्हणून मोठा दरारा होता. आजही तालुक्यात असंख्य शिवसैनिक थांबलेले असताना मारुती भाऊ अंभोरे यांच्या प्रवेशामुळे जुना कडवा शिवसैनिक पुन्हा सक्रिय होईल. पुन्हा त्याच जोमाने शिवसेनेचे काम करेल, मारुती अंबुरे यांनी तालुक्यात घर गांव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले, त्याची सुरुवात अकलूज मधून करणार असे ते म्हणाले, त्यांच्याबरोबर जोशी समाजाचे नेते प्रताप भोसले, रवी भोसले व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला . या प्रसंगी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे माळशिरस तालुका प्रमुख संतोष राऊत, उप तालुका प्रमुख महादेव बंडगर ज्येष्ठ शिवसैनिक व माळीनगर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण डोईफोडे अकलूज शहर प्रमुख अनिल बनपट्टे तालुका समन्वयक दीपक दोरकर, मिलिंद मोरे रज्जाक मुलानी उपस्थित होते