पदाधिकाऱ्यांनी लोकसभेसारखी संधीची किमया करून दाखवावी ; खा.धैर्यशील मोहिते पाटील

पदाधिकाऱ्यांनी लोकसभेसारखी संधीची किमया करून दाखवावी ; खा.धैर्यशील मोहिते पाटील
संचार वृत्त अपडेट
शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करण्यासाठी संधी दिली आहे ,याचा फायदा घेऊन पदाधिकाऱ्यांनी येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकांच्या निवडणुकीत लोकसभेसारखी किमया करून संधीचे सोने करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माढयाचे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
येथील शिवरत्न बंगल्यावर शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांच्या निवडी करून त्यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, कार्याध्यक्ष रवी पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी
यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.त्यावेळी मोहिते पाटील बोलत होते.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष
माळशिरस देविदास ढोपे ,सांगोला- दत्तात्रय सावंत, माढा बाळासाहेब पाटील,अक्कलकोट बंदेनवाज कोरबू ,करमाळा अमरजीत साळुंखे, दक्षिण सोलापूर दत्तात्रय घोडके, मोहोळ विनायकुमार पाटील,पंढरपूर अतुल चव्हाण,मंगळवेढा पांडुरंग चौघुले, बार्शी महेश चव्हाण,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पदी सागर पडघळ, उपाध्यक्ष पदी स्वाभिमान कदम, सचिवपदी अक्षय शिंदे,अकलूज शहर अध्यक्षपदी सुरेश गंभीरे, मंगळवेढा शहर अध्यक्षपदी चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्या निवडी करण्यात आल्या.
जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सांगोल्याचे नूतन अध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले.