प्रामाणिक काम करणारे राम सातपुते यांच्याकडेच माळशिरस तालुका भाजपचे नेतृत्व असेल ; जयकुमार गोरे पालकमंत्री

प्रामाणिक काम करणारे राम सातपुते यांच्याकडेच माळशिरस तालुका भाजपचे नेतृत्व असेल ; जयकुमार गोरे पालकमंत्री
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील माने-पाटील परिवार हा मूळचा म्हसवड येथील असून माण तालुक्याशी त्यांची नाळ घट्ट असून आपल्या उद्योग व्यवसायाशी प्रामाणिक असणारे सुजयसिंह माने-पाटील हे माळशिरस तालुक्यात भाजपासाठीदेखील तितकेच प्राम ाणिकपणे काम करीत आहेत. माजी आ. राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात भाजपासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या कर्तृत्ववानांकडेच माळशिरस तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व असेल, अशी ग्वाही ग्राम विकास, पर्यटन तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
अकलूज येथे भाजपा मंडळ अध्यक्ष सुजयसिंह माने-पाटील यांच्या निवासस्थानी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी आ.राम सातपुते, जि.प.चे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, शशिकांत उर्फ बाळासाहेब माने पाटील, हिंदुराव माने-पाटील, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, संजय देशमुख, महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, माने-पाटील, माने-देशमुख परिवार उपस्थित होते. पालकमंत्री गोरे यांनी आगामी काळ हा निवडणुकांचा काळ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या भाजपाला अग्रभागी ठेवण्याचे आवाहन केले.
माळशिरस भाजपात काही लोकांनी बंडाळीची आवई उठविल्यानंतर पालकमंत्री प्रथमच माळशिरस तालुक्यात आले होते. यावेळी माळशिरस भाजपाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर आगामी काळात निवडणुकांसाठी माजी आ. राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका लढवल्या जातील, असे अधोरेखित केले. यामुळे आगामी काळात माळशिरस तालुक्यातील सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर माजी आ. राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली होणार असे संकेत त्यांनी दिले. यावेळी हिंदुराव माने-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुजयसिंह माने-पाटील यांनी करून सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन संतोष साठे तर आभार अमरसिंह माने-देशमुख यांनी मानले.
माने-पाटील परिवार हा श्रध्दा व निष्ठावान
माने-पाटील परिवाराने गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी अहोरात्र काम केले. माळशिरस तालुक्यात माने-पाटील परिवाराकडे श्रद्धेने व निष्ठेने पाहिले जाते. आपली श्रद्धा, निष्ठा व प्रामाणिकपणा अशी ओळख असणारा माने-पाटील परिवार हा भाजपाच्या स्मरणात कायमच असेल. यामुळे माने-पाटील परिवारासोबत मुख्यमंत्री, पालकमंत्री व स्वतः मी असेन.
माजी आ. राम सातपुते