solapur

औषधांमधील हेराफेरी थांबेल ?

औषधांमधील हेराफेरी थांबेल ?

संचार वृत्त अपडेट

खोकल्याच्या औषधासंदर्भात अर्थात कफ सिरपवर सातत्याने सवाल उपस्थित होत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात कफ सिरपचे सेवन केल्याने अनेक मुलांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही अशी प्रकरणे समोर येत असल्याने केंद्रासह अनेक राज्यांनी काही कफ सिरपवर बंदी घातली असली तरी औषधांमधील हेराफेरी पूर्णपणे नष्ट होईल याची खात्री देता येत नाही, हेच या घटनेवरुन समोर येत आहे. घडलेल्या घटनेबद्दल जनतेतून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. देशात पुन्हा एकदा या प्रकरणावरुन गदारोळ माजला आहे. यावेळी कोल्ड्रिफ सिरपचे प्रकरण आहे. या सिरपमध्ये डायएथिलिन ग्लायकॉल नावाचे धोकादायक रसायन आढळून आले आहे. हे रसायन शरीरात गेल्यास ते किडनी, लिव्हर डॅमेज यासह मृत्यूचे कारण देखील बनते. त्यामुळे घडलेली ही घटना किती धोकादायक आहे, हे दिसून येते. कफ सिरप कोल्ड्रिफ कंपनी तमिळनाडूमधील पेरंबुदूरच्या भागात श्रीसन फार्मास्यूटिकल्स या नावाने कार्यरत होती. मात्र ही घटना काही नवखी नाही. याअगोदर देखील असले प्रकार घडले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियामक मंडळ असते. मात्र, त्याची कामगिरी योग्य होईल की नाही याची खात्री देता येत नाही, हे या प्रकरणावरुन अधोरेखित होत आहे. जर असल्या मृत्यूच्या घटना घडल्यानंतरच मंडळ जागे होणार असेल तर ते काय कामाचे? आर्थिक व्यवहार सोपस्कार करुन परवाना देणे यासारखे प्रकार घडत असतील तर ते जीवावर उठणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे घेणे महागात पडू शकते. त्यासाठी खबरदारी घेऊन औषधांचा वापर करणे गरजेचे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button