solapur

अश्व संगोपन प्रेमाने करणारे फारच कमी तशे प्रेम करताना इतर कोणताही नाद लागत नाहीत; डॉ.धवलसिंह मोहिते पाटील 

अश्व संगोपन प्रेमाने करणारे फारच कमी तशे प्रेम करताना इतर कोणताही नाद लागत नाहीत; डॉ.धवलसिंह मोहिते पाटील 

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथे श्रीराम अश्व प्रदर्शन हॉर्स व डॉग चे पार पडले.हे प्रदर्शन गेली सात वर्ष भरते आहे. ग्रामीण भागामध्ये चांगल्या आश्वाचे परीक्षण व संगोपन कसे करावे. याची माहिती अश्व प्रेमींना मिळते.आणि चांगलं ब्रीडिंग करण्यासाठी प्रेरणा या माध्यमातून लोकांना मिळते आम्ही पहिल्यांदा जेव्हा सुरू केला माझ्याबरोबर आमचे मित्र शशांक पवार व जनसेवेचे सर्व कार्यकर्ते यांनी मिळून सुरू केला. सुरुवातीच्या वर्षी असणारे घोड्यांची क्वालिटी आणि संगोपन आज आम्ही पाहतो की आज एक नॅशनल लेवलला ज्या पद्धतीने हॉर्सच्या माध्यमातून चांगली निगा घेतली जाते. जातिवंत अश्व सांभाळण्याचं आणि जोपासण्याचे काम शेतकऱ्यांच्या माध्यमातून अश्व प्रेमींच्या माध्यमातून वाढते आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा या शोचे आयोजन केले. महाराष्ट्रात सगळ्यात पहिला अश्व शो होतो. आणि त्याच्यानंतर मग सारंखेड, माळेगाव येथे होतो. दशकांपासून चांगली संधी या शोच्या माध्यमातून चांगला शो पाहण्याची संधी मिळते. प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब हे अतिशय चांगले घोडे स्वार होते. आणि चांगले नसलचे अस्व सांभाळणे हा त्यांचा शोक होता. वडिलांबरोबर लहानपणापासून घोड्यांची यात्रा करत असताना त्यांनीच आम्हाला रायडिंग शिकवले.आणि एकदा माणसांची मांड घोड्यावर पक्की झाली की मग दुसरा कुठलाही नाद लागत नाही. एक सक्षम आणि निरोगी तरुण पिढी घडवण्यामध्ये अश्वंचा फार मोठा रोल राहील. अशा या प्रदर्शनातून चालना मिळते आणि जेणेकरून चांगली नसल जी आहे ती पुढे येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ह्या शोचा अत्यंत उपयोग होतोय आणि वरचेवर अकलूज मधला शो आहे जो पहिला शो घेण्यात आला होता त्याची क्रेज,प्रेम लोकांमध्ये वाढताना दिसत आहे.असे डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

माझी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने दोन दिवसाचे हॉर्स व डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या शोचे उद्घाटन करण्यात आले.

सदर शो साठी कोल्हापूरचे सरदार  मानसिंगराव गायकवाड, नागपूरचे छत्रपती मानसिंगराव भोसले, बारामतीचे राजेंद्र पवार, पुण्याचे आदित्य राजे घुले या मुख्य पाहुण्यासह उर्वशीराजे मोहिते पाटील, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार, सतीश पालकर, सुधीर रास्ते ,मयूर माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button