solapur

राम सातपुतेंच्या मेळाव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून दखल फडणीसांचा व्हिडिओ कॉल द्वारे थेट मेसेज

राम सातपुतेंच्या मेळाव्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून दखल फडणीसांचा व्हिडिओ कॉल द्वारे थेट मेसेज

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यातील भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळी स्नेहमिलनाच्या निमित्ताने एकत्रित आले हे अतिशय आनंदाची बाब आहे एकत्र येऊन सण साजरे करणे ही आपली संस्कृती आणि परंपराच राहिली आहे मी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी प्रचंड परिश्रम केले पाय रोऊन इथला कार्यकर्ता लढला याचा मला नेहमीच अभिमान आहे आणि राहील निवडणुकीत कधी यश तर कधी अपयश येत असतं पण आपला विचार टिकला पाहिजे आणि त्यासाठीच लढले पाहिजे तुम्ही सगळे विचारांसाठी लढला आणि विचारांनी जिंकला सुद्धा आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वात माळशिरस तालुक्यात भाजपचे कमळ फुलवायचे आहे आणि महायुतीला जिंकून द्यायचे आहे राम सातपुतें सारख्या नेत्याचे हात मजबूत करायचे आहेत रामभाऊंनी विधानसभेत तर आपली ओळख निर्माण केलीच पण त्यांच्यासारखा चळवळीतील कार्यकर्ता विरळा असतो मला खात्री आहे की हा लढा आपण नक्की जिंकू.

देवेंद्र फडणीस ,मुख्यमंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button