solapur

अकलूज न.प.निवडणुकीतील भाजप च्या सर्व उमेदवारांची गुप्त बैठक संपन्न

अकलूज न.प.निवडणुकीतील भाजप च्या सर्व उमेदवारांची गुप्त बैठक संपन्न

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीतील भारतीय जनता पक्षांच्या सर्व उमेदवारांची गुप्त बैठक नुकतीच संपन्न झाली.उद्या दि.२१ डिसेंबर रोजी अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी होणार त्याचे नियोजन करण्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध विषयावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. जयराज  माने-पाटील यांच्या बंगल्यावर भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांची व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण विषयावर गुप्त बैठक पार पडली.ही बैठक आत्मविश्वास पुर्ण होती.
उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रभागांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना सकारात्मक वातावरण अकलूजमध्ये असून सर्व उमेदवार विजयी होतील असे स्पष्ट संकेत उमेदवारांच्या चहे-यावर दिसत होते.यावेळी सर्वांनी एकमेकांना विजयी शुभेच्छा देत संघटनात्मक एकजूट आणि आत्मविश्वास व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button