solapur

सातपुते यांचा आज दिवाळी स्नेहमिलन मेळावा माळशिरस तालुक्याचे चित्र स्पष्ट होणार ?

सातपुते यांचा आज दिवाळी स्नेहमिलन मेळावा माळशिरस तालुक्याचे चित्र स्पष्ट होणार ?

संचार वृत्त अपडेट 

 राम सातपुते मित्रपरिवार व माळशिरस तालुक्यातील सर्व स्नेहजनासाठी, आणि मान्यवर जनतेसाठी आपुलकीचे बंध अधिक दृढ व्हावेत, या हेतूने दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार राम सातपुते यांनी केले आहे. शनिवारी दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी सायं. ६ वाजता नातेपुते येथील मधुर मिलन सांस्कृतिक भवन येथे आयोजित केले आहे. या स्नेहमिलनसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर तसेच भाजपाचे अनेक नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दिवाळीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, माजी आमदार राम सातपुते यांच्या स्नेहमेळाव्याकडे सर्व राजकीय पक्ष, विविध गटातील नेत्याचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्या भाषणाने माळशिरस तालुक्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button