पत्रकारांना प्रशासनाकडून मिळणारी वागणूक कर्तव्यावर गदा आणणारी ; अमोल माने

पत्रकारांना प्रशासनाकडून मिळणारी वागणूक कर्तव्यावर गदा आणणारी ; अमोल माने
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगर परिषदेत होणाऱ्या मासिक सभांना स्थानिक पत्रकारांना निमंत्रण दिले जात नसल्याचा मुद्दा समोर आला असून, याबाबत अमोल माने यांनी निवेदनाद्वारे पत्रकारांना नियमित निमंत्रण देण्याची मागणी केली आहे.दिलेल्या निवेदनात अकलूज नगर परिषद स्थापनेपासून मासिक सभा नियमितपणे होत असल्या तरी या सभांना पत्रकारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे. नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचावी यासाठी पत्रकारांची उपस्थिती महत्त्वाची आहे. मात्र, प्रशासनाकडून पत्रकारांना निमंत्रण न दिल्यामुळे माहितीचा अभाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार या सभा सार्वजनिक स्वरूपाच्या असल्याने पत्रकारांना उपस्थित राहण्याचा अधिकार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या सर्व मासिक सभांसाठी अकलूज शहरातील पत्रकारांना अधिकृत निमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन पत्रकारांना सभेत सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी भाजप अकलूज शहर सरचिटणीस अमोल माने, यांच्यासह अकलूज नगर परिषद भाजप गटनेते राहुल लोंढे, नगरसेवक महेश शिंदे, OBC मंडल अध्यक्ष अमर शेख, शंकर मस्के, संतोष वाघमोडे उपस्थित होते. यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पत्रकारांना प्रशासनाकडून मिळणारी वागणूक कर्तव्यावर गदा आणणारी
पत्रकार बांधवांना प्रशासनाकडून मिळणारी वागणूक ही त्यांच्या कर्तव्यावर गदा आणणारी आहे. या निवेदनाची दखल घेऊन नगरपरिषद प्रशासन आगामी सभेपासून पत्रकारांसाठी दालन खुले करावे.
अमोल माने , अकलूज शहर भाजप सरचिटणीस



