solapur

अकलूज पोलिसांकडून महिला दिनानिमित्त मान्यवर महिलांचा सन्मान

अकलूज पोलिसांकडून महिला दिनानिमित्त मान्यवर महिलांचा सन्मान

संचार वृत्त अपडेट

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील मान्यवर व समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिलांना फेटा बांधून पुष्पगुच्छ,फुलांचे रोप देऊन गौरविण्यात आले. समाजातील महिलांचे योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी सहभाग घेतला. महिलांच्या सन्मानामुळे समाजात महिलांप्रती आदर व प्रेरणा निर्माण होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी अकलूज पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. सदर कार्यक्रमास अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्ष, महिला नगरसेवक, अकलूज पोलीस ठाणे येथील महिला पोलीस पाटील, महिला होमगार्ड, महिला दक्षता समितीतील डॉक्टर,वकील, शिक्षक समाजसेविका असे सर्व सदस्य तसेच पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपल्या अनुभवांबरोबरच महिलांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी, समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले. तसेच महिला सुरक्षेबाबत आणि सक्षमीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button