solapur

माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोटला मिळणार समिती ? झेडपीच्या पाच विषय समिती सभापतींची आज निवड

माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोटला मिळणार समिती ?

झेडपीच्या पाच विषय समिती सभापतींची आज निवड

 संचार वृत्त अपडेट 

माळशिरस, सोलापूर पंढरपूर व अक्कलकोट व मोहोळ पदाच्या तालुक्याला समिती अध्यक्ष पदासाठी संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी आज होणाऱ्या जिल्हा परिषद समित्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. मागील आठवडी अध्यक्ष पदी बार्शी तालुक्यातील दिपक वैद्य तर उपाध्यक्ष पदाची संधी उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजित पवार यांना भाजपने संधी दिली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी आता झेडपीच्या कारभाराला – सुरूवात देखील केली आहे. पंरतु

अनेकांनी लावली फिल्डिंग

जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाची संधी मिळावी यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली असल्याचे समजते. यामुळे पालकमंत्री यांचे पारडे कोणाकडे झुकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

आता समाजकल्याण, कृषि व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य, महिला बालकल्याण आणि अर्थ व बांधकाम समिती सभापतीची निवड आज होणार आहे. अर्थ व बांधकाम समिती सभापती पदाची संधी उपाध्यक्ष पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर अक्कलकोट तालुक्याला महिला बालकल्याण आणि माळशिरस तालुक्यासाठी समाजकल्याण ही समिती जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यासाठी आज जिल्हा परिषदेची विशेष सभा झेडपीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पाडणार आहे. त्यासाठी सकाळी १० ते १२ या वेळेत सभापती साठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर छाननी, माघार साठी १५ मिनिटांची संधी, त्यानंतर निवडणुकीच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड ही बिनविरोध झाल्याने आता समित्यांची निवड ही बिनविरोधच होणार हे जवळपास निश्चित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button