solapur

संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार ; संस्कृती सातपुते 

संस्कृती सातपुते यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड

सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार ; संस्कृती सातपुते 

संचार वृत्त अपडेट 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतीपदी संस्कृती सातपुते यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या कष्ट, जिद्द आणि सहकार्यातून त्यांनी हे महत्त्वाचे पद मिळवले आहे.
संस्कृती सातपुते यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जनसंपर्काच्या बळावर राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले. याच कामाची दखल घेत त्यांची समाज कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील समाज कल्याणाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी त्या अधिक सक्षमपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संस्कृती सातपुते यांनी या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले असून, “सामान्य नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” अशी ग्वाही दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button