विकास कामाला प्राधान्य दिले जाईल ; जयश्री एकतपुरे

विकास कामाला प्राधान्य दिले जाईल ; जयश्री एकतपुरे
महिला,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
संचार वृत्त अपडेट
माळेवाडी (प्रभाग १३) येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेविका जयश्री एकतपुरे यांच्या पुढाकारातून “विनंती बस थांबा” व नवीन बाकड्यांचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या वेळी बस थांब्याचे व बाकड्याचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा करताना बसण्यासाठी सुसज्ज बाकडी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नगरसेविका जयश्री एकतपुरे यांनी सांगितले की, “प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पुढील काळातही अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.”या कार्यक्रमाला परिसरातील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत करून नगरसेविकांचे आभार मानले.

या प्रसंगी नगरसेविका दिपालीताई वाघमोडे, सरचिटणीस अमित टिळेकर, संतोष कृष्णा वाघमोडे, संजय एकतपुरे, लहू कांबळे, संजय खुडे, अतुल बनकर, दिलीप बनकर, दादा सावंत, नारायण शिंदे, नवनाथ साठे, गाडेकर, राजीव फुले, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



