solapur

रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा अकलूज ते तांबवे ७० वर्षांपूर्वीच्या बंद रस्ता होणार सुरू 

रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अकलूज ते तांबवे ७० वर्षांपूर्वीचा बंद रस्ता होणार सुरू 

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगरपरिषद प्रभाग २ मधून जाणाऱ्या अकलूज ते तांबवे या ७० वर्षांपूर्वीच्या बंद रस्त्याचा कामाचा शुभारंभ अकलूज नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करण्यास अडथळे येत होते. त्यामुळे त्यांची गैरसोय वाढली होती. मात्र आता या कामाच्या शुभारंभामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्ता सुरू झाल्यानंतर वाहतूक सुलभ होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी मोठी मदत होणार आहे.
या वेळी उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम करून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक विलास क्षीरसागर, सचिन देशमुख, मोहसीन शेख, अजहर शेख, शिरीष देशपांडे, संभाजी माने, शब्बीर शेख,राजू राऊत, विशाल फुले, बाळासाहेब मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

• रणजितसिंह मोहिते पाटील यांची दूरदृष्टी 

अकलूज-तांबवे हा जुन्या रस्त्यावरून अतिक्रमामुळे वाहतूक होत नव्हती व तो रस्ता बंदच पडला होता. तरीही या रस्त्याच्या वरून जाणारा संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दूरदृष्टी ठेवून भुयारी मार्ग ठेवावा यासाठी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कडे पाठपुरावा करून भुयारी मार्ग ठेवला.या भुयारी मार्गाचा आता उपयोग होणार आहे.

विलास क्षीरसागर (नगरसेवक) 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button