solapur

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना हक्काची इमारत मिळणार का ? सभापती संस्कृती सातपुते मैदानात 

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना हक्काची इमारत मिळणार का ? सभापती संस्कृती सातपुते मैदानात 

संचार वृत्त अपडेट 

अकलूज, ता.माळशिरस येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह आहे, मात्र सदर वसतिगृहास स्वतःची जागा व इमारत नसल्याने ते वसतिगृह तात्पुरते भाड्याच्या जागेत चालवले जाते. सदर ठिकाणी विद्यार्थांना चांगल्या सुविधा देता येत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते. सदर वस्तीगृहासाठी शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्याची मागणी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी केली.

गेली अनेक वर्षे हे वसतीगृह अकलूज येथे सुरू आहे, मात्र वसतिगृहाला स्वतंत्र मालकी हक्काची जागा व इमारत नाही, ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी राहत असतात, मात्र सुविधा नसल्याने अभ्यासावर त्याचा परिणाम होतो, ही अडचण सोडविण्यासाठी समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे मागणी करत पाऊल उचलले आहे. सभापती पदाचा पदभार घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत त्यांनी कामाचा धडाका लावला आहे, अशातच या वसतिगृहाच्या प्रश्नाकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुढे आल्याने आगामी काळात समाजकल्याण खात्यांतर्गत चांगले काम होईल अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa