solapur

‘उद्योगातून समृद्धी’कडे वाटचाल ; शिवप्रसाद उद्योग समूहाचा पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते शुभारंभ

उद्योगातून समृद्धी’कडे वाटचाल; शिवप्रसाद उद्योग समूहाचा पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते शुभारंभ

संचार वृत्त अपडेट 

तालुक्याच्या औद्योगिक व सहकार क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘शिवप्रसाद उद्योग समूहा’चा शुभारंभ  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला.नातेपुते येथील सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांनी फीत कापून व श्रीफळ वाढवून केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री गोरे म्हणाले, “शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल..हा उद्योग समूह तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालेल, असा विश्वास व्यक्त करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य मिळेल.उद्योगातून समृद्धी’कडे वाटचाल करेल.

शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समूहाची यशस्वी घोडदौड सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी समूहाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत, शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी जाहीर करण्यात आला.
याचबरोबर, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी SPG मल्टिस्टेट या संस्थेची सुरुवात करण्यात आली असून, शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे.

या कार्यक्रमाला समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते,आमदार रामहरी रुपनवर, बाबाराजे देशमुख, सुजय भैया माने – पाटील, प्रकाश पाटील, आप्पासाहेब देशमुख, शशीकांत कल्याणी, महादेव कावळे, उत्तमदादा फडतरे, राजकुमार हिवरकर, बी वाय राऊत, शिवराज पुकळे, अनिल इंगवले, बंडोपंत लवटे, चंद्रकांत जाधव, मोरे डॉक्टर, देविदास पाटील, रणधीर पाटील, रणवीर देशमुख, अतुल जाधव, निलेशजी ननावरे, बाजीराव काटकर, संजय पाटील , निनाद पाटील, मोहन सावंत, भारत सूळ, वीरेंद्र पांढरे, भाऊबली चंकेश्वरा, वालचंद काळे, रणजीत सूळ, प्रकाश वलेकर, नरेंद्र कवितके, संतोष काळे, राहुल निकम, सचिन पवार, बाळासाहेब चिकणे, चांगन सर, संजय कदम, संजय किर्दक, सोमनाथ, संजय उराडे, माऊली उराडे, भगत महाराज, जाधव, राजेंद्र पांढरे, सतीश शिंदे, जगन्नाथ मगर, संजय पवार, हितेश सावंत, एन के साळवे, अय्याज मुलाणी, सुधीर मोरे, सतीश मोरे, योगेश चिकणे, अभिजीत चिकणे, बाळासो खिलारे, धनाजी खुसपे, अमर रनवरे, सुनील राऊत, श्री निवास कदम, हेमंत उराडे, पिसे सर, भोसले पत्रकार, प्रमोद शिंदे, तनुजा खिलारे, माया उराडे, नीलम जाधव तसेच अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, ग्रामस्थ आणि मोरे परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सहकार क्षेत्रातील दिग्गज, उद्योजक, व्यापारी, महिला बचत गटाच्या सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योग समूहाच्या संचालक मंडळाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button