लेन्सकार्ट शोरूममध्ये भाजपची धडक ; ‘कपाळावर टिकली, हातात गोफ हाच आमचा सन्मान ; अमरसिंह देशमुख

लेन्सकार्ट शोरूममध्ये भाजपची धडक ; ‘कपाळावर टिकली, हातात गोफ हाच आमचा सन्मान ; अमरसिंह देशमुख
लेन्सकार्टच्या ‘ड्रेस कोड’वरून भाजपने टिकली,गोफ लावून दिला सांस्कृतिक संदेश
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील लेन्सकार्ट कंपनीच्या शोरूममध्ये कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडला भाजप नेते अमरसिंह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. ड्रेस कोडच्या नावाखाली भारतीय महिलांच्या कपाळावरील टिकली व हातातील गोफ/बांगड्या या धार्मिक परंपरांना आडकाठी केली जात असल्याचा आरोप करत, त्यांनी व्यवस्थापनाला ड्रेस कोड बदलण्याची मागणी केली.
शोरूममध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अमरसिंह देशमुख व जि. प. माजी सदस्य अशोक गायकवाड, सोलापूर जिल्हा महिला मोर्चा महामंत्री दिपाली मोहिते देशमुख,भारतीय जनता पक्ष अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे, संतोष टकले, निलेश ननवरे, गोपालक अमर जाधव, राजकुमार कुलकर्णी तसेच इतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन व महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शोरूममधील महिला कर्मचाऱ्याच्या कपाळावर टिकली लावली व हातात गोफ बांधला. ‘कपाळावर टिकली आणि हातात गोफ ही केवळ शोभा नसून आमची धार्मिक व सांस्कृतिक ओळख आहे. नोकरीसाठी ही अस्मिता गहाण ठेवता येणार नाही,’ असे आवाहन त्यांनी केले.

कंपनीच्या नियमांनी परंपरा डावलता येणार नाही’
यावेळी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, “कोणत्याही मल्टिनॅशनल कंपनीने भारतीय संस्कृती व हिंदू धर्माच्या परंपरांचा सन्मान केला पाहिजे. ड्रेस कोडच्या नावाखाली आमच्या भगिनींना टिकली, मंगळसूत्र, गोफ काढायला लावणे हा आमच्या अस्मितेवर घाला आहे. लेन्सकार्ट व्यवस्थापनाने तातडीने हा ड्रेस कोड बदलून धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करावा.या घटनेनंतर शोरूममध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यवस्थापनाने यावर काय भूमिका घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अकलूज परिसरात हा विषय चर्चेचा बनला आहे.
हे सर्व पाहता आता कंपनीने पॉलिसी बदललेली आहे आज पासून परिपत्रक बदलून घेतले असल्याचे व्यवस्थापक पियूश बन्सल यांनी सांगितले



