solapur

शिवप्रसादचा आरोग्यसेवेचा महायज्ञ! शेकडो नागरिकांची मोफत तपासणी, गरजूंना चष्म्यांचे वाटप

शिवप्रसादचा आरोग्यसेवेचा महायज्ञ! शेकडो नागरिकांची मोफत तपासणी, गरजूंना चष्म्यांचे वाटप

संचार वृत्त अपडेट 

नातेपुते ता. माळशिरस येथे ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रसाद अर्बन, नातेपुते येथे हे शिबिर पार पडले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 397 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 212 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर मोठा आधार ठरले.


शिबिरात डोळ्यांची तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, मधुमेह तपासणी, कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी तसेच मेंदूविकार तपासणी अशा विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, किडनी व मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट, रेटिना, तिरळेपणा, पापणी पडणे तसेच मनका व मज्जातंतूंच्या आजारांवरील मोफत शस्त्रक्रियांची सुविधाही देण्यात आली.


तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत जागरूकता निर्माण केली. या उपक्रमामुळे गरजूंपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसून आले.शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद  मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी अशा मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून, शिवप्रसाद उद्योग समूह सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button