solapur

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य ; दीपाली वाघमोडे यांच्या पुढाकाराने झळकला हायमास्ट पथदिव्यांचे लोकार्पण

नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य ; दीपाली वाघमोडे यांच्या पुढाकाराने झळकला हायमास्ट पथदिव्यांचे लोकार्पण

संचार वृत्त अपडेट 

प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन नगरसेविका दीपाली वाघमोडे यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या हायमास्ट पथदिव्याचा शुभारंभ स्टेट बँकेसमोर करण्यात आला.
प्रभागातील मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे नागरिकांना, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत नगरसेविका दीपाली वाघमोडे यांनी नगर परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आज हा अत्याधुनिक हायमास्ट पथदिवा कार्यान्वित झाला.
या हायमास्टचे लोकार्पण नगरसेविका वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अजित गांधी,राहुल लोंढे नगरसेवक, अमोल माने सरचिटणीस, नागेश गुळवे,संतोष वाघमोडे,आदी मान्यवर उपस्थित होते.बटण दाबताच संपूर्ण परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाला.
यावेळी बोलताना नगरसेविका दीपाली वाघमोडे म्हणाल्या, “प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता व सोयीसुविधा देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. या हायमास्टमुळे रात्रीच्या वेळी होणारे अपघात व अनुचित प्रकार टाळण्यास मदत होईल. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार आहे. यापुढेही प्रभागातील अंतर्गत रस्ते, गटार व पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांवर प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या हायमास्टमुळे व्यापारी संकुल, बँक व रहदारीच्या रस्त्यावरील परिसर प्रकाशमान झाला असून, नागरिक व व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button