solapur

‘महामार्ग हवाच’ योग्य मोबदल्याच्या अटीवर शेतकऱ्यांचा शक्तिपीठ ला जाहीर पाठिंबा

‘महामार्ग हवाच’ योग्य मोबदल्याच्या अटीवर शेतकऱ्यांचा शक्तिपीठ ला जाहीर पाठिंबा

शक्तिपीठ महामार्गावरून ‘ यू-टर्न ‘ शेतकरीच मैदानात विकासाला विरोध नाही

बाधित शेतकऱ्यांनीच समर्थन दिल्याने आता प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे 

संचार वृत्त अपडेट 

शक्तिपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांनीच आता महामार्गाच्या समर्थनार्थ एकत्र येत सकारात्मक भूमिका घेतली आहे. “विकासाला आमचा विरोध नाही, योग्य मोबदला देऊन महामार्गाचे काम तातडीने सुरू करा,” अशी मागणी शेतकऱ्यांनी एकमुखाने केली आहे.

निमगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी महामार्गाच्या समर्थनार्थ एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली.विकासाला पाठिंबा शक्तिपीठ महामार्गामुळे दळणवळण वाढेल, शेतमालाला चांगला बाजार मिळेल व परिसराचा विकास होईल. त्यामुळे आमचा महामार्गाला पूर्ण पाठिंबा आहे. शासनाने बाजार भावाप्रमाणे व रेडी रेकनरच्या दहापट मोबदला द्यावा. तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीत व इतर योजनांमध्ये प्राधान्य मिळावे.काही संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नाही. आमचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतलेला आहे, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.”आमच्या जमिनी जाणार असल्या तरी, पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी महामार्ग आवश्यक आहे. सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शकपणे व जलद गतीने राबवून प्रकल्प मार्गी लावावा,” अशी मागणी बैठकीत करण्यात आली.शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या गटांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बाधित शेतकऱ्यांनीच समर्थन दिल्याने आता प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

सर्विस रोड, पाईपलाईन पासिंग, अंडरपास किंवा बोगदे याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत परंतु शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूने सर्विस रोड, पाचशे मीटर अंतरावर अंडरपास पलीकडच्या बाजूला राहणाऱ्या शेतजमिनीस पाईपलाईन नेता येणार आहे यामुळे शक्तिपीठ महामार्गाचे स्वागतच आहे परंतु मोबदल्यासाठी सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .

• विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा

शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये इतर लोकांची संख्या जास्त आहे ज्यांचे क्षेत्र या महामार्गात जात आहे त्या 90 टक्के लोकांचा पाठिंबा आहे परंतु विनाकारण विरोधाभास केला जात आहे विरोध करणाऱ्या लोकांना आमची विनंती आहे आमची काळजी करण्यापेक्षा भावी पिढीचा व आपल्या विकासाचा विचार करून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा व तालुक्याच्या व गावच्या विकासाला हातभार लावा

किरण पाटील,
ग्रा.पं.सदस्य, निमगाव मगराचे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button