शून्य थकबाकी शंभर टक्के वसूली प्रतापसिंह मोहिते पाटील सोसायटीचा विक्रम

शून्य थकबाकी शंभर टक्के वसूली
प्रतापसिंह मोहिते पाटील सोसायटीचा विक्रम
थकबाकी ला टाळा वसूलीला सलाम
कर्तव्यदक्ष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
संचार वृत्त अपडेट
कर्ज वसुलीच्या बाबतीत जिल्ह्यात आदर्श ठरणारा निर्णय प्रतापसिंह मोहिते पाटील सहकारी सोसायटीने घेतला आहे. सोसायटीने आर्थिक वर्षात 100 टक्के कर्ज वसुलीचा टप्पा गाठून बँकिंग क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.या यशस्वी कामगिरीमागे बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोलाची भूमिका असल्याने सोसायतीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला.वसुली म्हणजे केवळ आकडेवारी नाही, तर सदस्यांचा विश्वास जिंकण्याचा तो प्रकार आहे. 100% वसुली हे आमच्या पारदर्शक कारभाराचे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे,” अशी प्रतिक्रिया सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.आर्थिक शिस्त, वेळेवर वसुली आणि सदस्यांशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे सोसायटीने इतर संस्थांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. सत्कार सोहळ्याला संचालक मंडळ, सभासद आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकलूज (उदयनगर चौंडेश्वर वाडी) ता.माळशिरस येथील प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत १० जून २०२६ रोजी १०० टक्के कर्ज वसुलीचा मानाचा टप्पा गाठला आहे.संस्थेची सभासद संख्या ४०३ असून भागभांडवल रुपये १८,७१,१११ इतके आहे.संस्थेमार्फत एकूण रुपये २ कोटी ९० लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. सर्व सभासदांनी वेळेत कर्जाची परतफेड केल्याने संस्था शंभर टक्के वसुलीपात्र ठरली.
या यशामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे बँक इन्स्पेक्टर रामचंद्र पवार शाखाधिकारी विजय कचरे,ज्युनीयर ऑफिसर वैजीनाथ पवार,कॅशियर मोहिनी खुडे,लिपिक आश्विनी मोठे,प्रियंका चव्हाण तसेच विश्वासू शिपाई सुदाम सावंत व महेंद्र गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव इंगवले देशमुख, व्हाईस चेअरमन विठ्ठलराव चव्हाण, तज्ज्ञ संचालक समाधान इंगवले देशमुख,हरिचंद्र किर्दकर,सदाशिव रिसवडकर,खंडाळी गावचे गटनेते अमर रिसवडकर,क्लार्क अविनाश साठे,भारत साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच भाऊसाहेब बाबर,भाऊसाहेब काटकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करून सभासदांनी दाखविलेल्या आर्थिक शिस्तीचे अभिनंदन केले.ग्रामीण भागातील सहकार चळवळीला बळकटी देणारी ही कामगिरी इतर संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


