solapur

सीमेवरील भावांनो तुम्ही एकटे नाही आहात ! माळशिरस करांची जवानांना अनोखी ओवाळणी

सीमे वरील भावांनो तुम्ही एकटे नाही आहात !
माळशिरस करांची जवानांना अनोखी ओवाळणी !

संचार वृत्त अपडेट

सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या लाडक्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेला “एक राखी सैनिकांसाठी” हा अनोखा आणि पवित्र उपक्रम अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला. सीमेवरील सैनिकांपर्यंत आपल्या भागातील नागरिकांचे प्रेम आणि आदर पोहोचवण्याच्या उद्देशाने या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


पंचायत समिती सभागृह हॉल, माळशिरस येथे हा सोहळा पार पडला. कार्यक्रमा दरम्यान आपल्या कुटुंबाचा त्याग करून देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी संपूर्ण माळशिरस तालुका खंबीरपणे उभा आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन निमंत्रक तानाजी  वाघमोडे, शोभा वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी माळशिरस आणि परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे
आपल्या लाडक्या सैनिकांसाठी तब्बल ६,००० राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत. या सर्व राख्या सीमाभागात तैनात असलेल्या जवानांसाठी रवाना करण्याचा कार्यक्रम  डीवायएसपी प्रदीप गोरड, राज्याचे माजी मंत्री,आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी माजी सैनिक संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे ,भोसले साहेब, आनंद शेंडगे पंचायत समिती सदस्य, सुभेदार मेजर राजू खराडे वेळापूर, ऑनररी नायब सुभेदार राजू पाटील नातेपुते, सुभेदार मोरे महाराज नातेपुते,मारुती वाघमोडे, हरिश्चंद्र साळुंखे, वीर पत्नी, सिंधू ढोबळे वीर पत्नी शोभा सावंत, नगरसेविका एडवोकेट रेश्मा टेळे, नगरसेविका पुष्पाताई कोळेकर, पांडुरंग वाघमोडे, विष्णू गोरड, शिवाजी गोरड विकास कोळेकर बापू वाघमोडे वंदना कोळेकर अहिल्या वाघमोडे राणी साठे पूजा ढावरे, फार्मासिस्ट मकरंद कुदळे ,नितीन गायकवाड, सचिन गाडेकर,जगदीश राजमाने, पत्रकार भारत मगर, एल डी वाघमोडे, निनाद पाटील, लक्ष्मीकांत कुरुडकर, स्वप्निल राऊत संजय हुलगे तसेच तालुक्यातील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कुटुंबाने गेल्या काही महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू केली होती. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या कामात हातभार लावला. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना, केवळ सैनिकांबद्दल असलेल्या आदरयुक्त भावनेतून या कुटुंबाने हा संकल्प पूर्ण केला.
आपण सण-उत्सव आपल्या घरात सुरक्षितपणे साजरे करतो कारण आपले सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. त्यांच्या मनगटावर आपल्या प्रेमाची राखी बांधली जावी आणि त्यांना घरच्यांची कमतरता भासू नये, याच एका भावनेने आम्ही या राख्या बनवल्या आहेत.असे मत शोभा वाघमोडे यांनी व्यक्त केले.राख्यांसोबतच प्रत्येक सैनिकासाठी शुभेच्छा देणारे आणि त्यांचे आभार मानणारे एक लहानसे पत्रही पाठवण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार  गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार निनाद पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button