अकलूज मध्ये तिरंगा बाईक रँलीला मोठा प्रतिसाद तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

अकलूज मध्ये तिरंगा बाईक रँलीला मोठा प्रतिसाद
तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
संचार वृत्त अपडेट
नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे, देशाच्या राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान, अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच स्वातंत्र्यलढ्यातील वीर स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदानाचे स्मरण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने माळशिरस तालूका भाजप च्या वतीने अकलूज मध्ये तिरंगा बाईक रँलीचे आयोजन करण्यात आले होते.

या पदयात्रेत पाच हजार बाईक चालकांनी हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्तीची भावना घेऊन पदाधिकारी, माजी सैनिक संघटना, तरुण विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तिरंग्याच्या सन्मानार्थ भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे दिलेल्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या उत्साहाने संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला. या तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्राची एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.


विजय चौक येथून सुरु झालेली तिरंगा बाईक रँली विजय चौक, गांधी चौक,सदभाउ चौक,नविन बसस्थानक,प्रतापसिंह चौक,आंबेडकर चौक,नगर परिषद मार्गे पुन्हा विजय चौक येथे आली व तेथे समारोप करण्यात आला.
या बाईक रँलित आमदार सचिन कल्याण शेट्टी,गणेश चिवटे जिल्हाध्यक्ष,मा.आ.राम सातपुते,सुजय माने पाटील, प्रकाश पाटील, ज्योतीताई माने पाटील,राजलक्ष्मी माने पाटील, हंसराज माने पाटील, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे,मालोजीराजे देशमुख,महादेव कावळे, बाळासाहेब सरगर,संजय देशमुख अमित टिळेकर, महेश शिंदे,दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे,संतोष वाघमोडे, हरि पालवे,अमोल माने, औदुंबर येडगे,दिपाली देशमुख,भाजप पदाधिकारी,देश प्रेमी नागरिक, तरुण वर्ग आदी सहभागी झाले होते.



