अकलूजच्या अकलाई देवी मंदिर परिसरात स्वच्छता व साफसफाईचा उपक्रम

अकलूजच्या अकलाई देवी मंदिर परिसरात स्वच्छता व साफसफाईचा उपक्रम
संचार वृत्त अपडेट
अकलूज गावची ग्रामदैवत श्री अकलाई देवीची यात्रा (भंडारा) दि.३१ जुलै रोजी येत असून मंदिर व मंदिर परिसराची स्वच्छता व साफसफाई करण्याचे काम अकलूजमधील सामाजिक संघटना व विविध मंडळाचे सदस्य एकत्र येवून करीत असतात.गेली ४२ वर्षापासून ही सेवा करत आहेत.याचे नियोजन अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील करीत असतात.
आषाढी एकादशी झाल्यानंतर येणा-या पहिल्या मंगळावर किंवा शुक्रवार या दिवशी अकलाई देवीची यात्रा संपन्न होत असते.त्यापुर्वी अकलूजमधील लोकमान्य गणेश मंडळ,साईबाबा सेवा ट्रस्ट, शिवरत्न गणेश मंडळ,अकलाई देवी भक्त मंडळ,आरती मंडळ, बुरूज समाज,लिंगायत समाज, अकलाई देवीचे पुजारी गुरव परिवार,वडर समाज,हातगाडी संघटना व इतर समाजातील लोकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असतो. मंदिराच्या शिखरापासून मंदिर परिसर व देवीच्या गाभारा स्वच्छ व निर्मळ केला जातो.पुर्वीच्या काळी अकलूज ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टॅकरने मंदिर धुण्यासाठी पाणी वापरले जात होते पण सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत अत्याधुनिक पाणी फवारण्याच्या यंत्रामुळे दोन तीन कार्यकर्ते हे पाणी फवारण्याचे काम होवू लागले आहे.तर जेष्ठ नागरिकांनी मंदिरातील पुजेची भांडी घासून स्वच्छ करण्यात आले आहे. यावेळी तात्या गुळवे,विठ्ठल गायकवाड,ॲड.राजेंद्र आर्वे,उमेश शेटे,अरूण राऊत,गंगाधर देवकाते,दिपक शिंदे,उदय शेटे, पिंटू वैद्य,विजय टोंगळे,मोहन गुरव,मदन गुरव,अभिषेक गुरव, अक्षय गुरव,अनिरुद्ध गुरव महेश सुर्यवंशी,बाळासाहेब रिसवडकर, आप्पा आवताडे उपस्थित होते.
दरवर्षी अकलाई देवीच्या यात्रेच्या पुर्वी मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ व साफसफाई करण्याचे काम अकलूजमधील विविध मंडळातील सदस्य,सामाजिक संघटनेतील युवा कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक सहभागी होवून करीत असतात.हे काम गेली ४२ वर्षापासून सुरू असून या उपक्रमात तरूण वर्गाने सहभागी होवून सेवा करावी.यात सेवा करणारे अनेक जण वयोवृद्ध झाले.या उपक्रमात तरूणांचा सहभागात वाढ होण्याची अवश्यकता आहे.
किशोरसिंह माने-पाटील
माजी सरपंच अकलूज ग्रामपंचायत अकलूज.



