solapur

सहकार महर्षी साखर कारखान्यावर बॉयलर प्रदीपन सोहळा!

सहकार महर्षी साखर कारखान्यावर बॉयलर प्रदीपन सोहळा!

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूजच्या सन २०२६-२७ च्या ६५ व्या गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, या हंगामाच्या शुभारंभानिमित्त मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता बॉयलर प्रदीपन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कारखान्याच्या कार्यालयावर हा कार्यक्रम कारखाना संचालिका स्वरूपाराणी  मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे परिपत्रकातून जाहीर करण्यात आले आहे.
तसेच याच दिवशी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. संचालक विराज निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी विशाखा निंबाळकर यांच्या शुभहस्ते ही पूजा संपन्न होणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना सभासद, शेतकरी, कामगार, अधिकारी तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,कार्यकारी संचालक सुहास यादव,व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, संचालक मंडळ, अधिकारी व कामगारांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरु होत असल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button