solapur

प्रभाग ८ च्या विकास कामांचा शुभारंभ विविध रस्ते व गटारींच्या विकासाला गती

प्रभाग ८ च्या विकास कामांचा शुभारंभ
विविध रस्ते व गटारींच्या विकासाला गती

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर) 

अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, डीपीडीसी (DPDC) अंतर्गत मंजूर झालेल्या ४० लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेवक महेश शिंदे व नगरसेविका दिपाली वाघमोडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, माजी आ.राम सातपुते यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे.

प्रभागातील अनेक ठिकाणी रस्ते व गटारींच्या समस्यांमुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन या कामांसाठी शिंदे व वाघमोडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने प्रभागातील प्रलंबित विकासकामांना आता गती मिळणार आहे.
या निधीतून नवीन बाजार तळ येथील शंकर डावरे यांच्या घरासमोरील गटार, अजित बडे यांच्या घरासमोरील गटार व रस्ता, जावीर ते कांबळे परिसरातील गटार व रस्ता, १०/७० झोपडपट्टी परिसरातील गटार व रस्ता, मलबार ते ओढ्यापर्यंत गटार, अजित गांधी यांच्या घरासमोरील गटार, संतोष वाघमोडे यांच्या घरासमोरील गटार व रस्ता, तसेच बोर्डे वसाहत येथील गटारीवरील रस्त्याच्या कामांचा समावेश आहे.या विकासकामांमुळे प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा होण्याबरोबरच सांडपाणी निचऱ्याचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात गटारी तुंबणे, पाण्याचा निचरा न होणे तसेच खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या कामांचा थेट फायदा परिसरातील रहिवाशांना होणार आहे.केवळ निधी मंजूर करून न थांबता प्रभागातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न शिंदे व वाघमोडे यांनी केला आहे. माजी आ.राम सातपुते यांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या निधीमुळे प्रभागाच्या विकासाला चालना मिळाली असून, नागरिकांमधून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.यावेळी अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रभागातील प्रत्येक भागात दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे हेच उद्दिष्ट ठेवून विकासकामांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button