solapur

माळशिरस तालुक्यातील सर्व कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा,आंदोलनाचा जोर वाढणार,संघटना आक्रमक

माळशिरस तालुक्यातील सर्व कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा,आंदोलनाचा जोर वाढणार,संघटना आक्रमक

संचार वृत्त अपडेट 

 सन 2025 – 2026 च्या गाळप हंगामात तुटत असलेल्या ऊसाला पहिली उचल एक रकमी विना कपात प्रति टन जाहीर करावी आणि मगच कारखाने सुरू करावेत अशी मागणी करीत माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्री शंकर सहकारी सदाशिवनगर, सहकार महर्षी यशवंत नगर, दि सासवड माळी माळीनगर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी, पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर या कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना निवेदन देऊन मागणी केली.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पहिली उचल प्रति टन विना कपात जाहीर करावी यावर्षी साखरेला चांगला भाव असून इथेनॉल बगॅस,मोलिसीस, प्रेसमड, अल्कोहोल यांनाही चांगला भाव आहे उप पदार्थाचा दर ही स्थिर आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी येत्या 11 नोव्हेंबर2025 पूर्वी पहिली उचल जाहीर करावी अन्यथा 12 नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ नेते मगन काळे, विजय नेवसे,अजित बोरकर अमरसिंह माने-देशमुख,दत्ता भोसले, दिनेश ताम्हणे, अजय बोडरे नारायण बोराटे तेजस भाकरे, शिवाजी वाघमारे, बापू आडत,राजेश खरात, विलास काळे या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

अन्यथा कारखाने जबाबदार

माळशिरस तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर न करता आपले कारखाने सुरू केले आहेत यावर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे कारखानदारांनी भान ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पहिली उचल जाहीर करावी अन्यथा 12 नोव्हेंबर नंतर माळशिरस तालुक्यातील सर्वच साखर कारखान्यांचे धुराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना बंद करून गव्हाणीत ऊसाएवजी स्वाभिमानीचे कार्यकर्ते उतरतील यास सर्वस्वी साखर कारखानदार जबाबदार असतील.      अजित बोरकर, माळशिरस तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button