solapur

वेळापुरात ‘लव्ह जिहाद’ चा थरार !

वेळापुरात ‘लव्ह जिहाद’ चा थरार !

भगिनीला न्याय देण्यासाठी जात पात विसरून हिंदू म्हणून एकत्र येण्याची डॉ.धवलसिंह मोहिते पाटलांची हाक

संचार वृत्त अपडेट 

येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम इसमाने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, हा सरळ-सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार असल्याचा खळबळजनक आरोप हिंदुत्ववादी नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी केला आहे. या पीडित हिंदू कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या परिसरात सातत्याने घडणाऱ्या अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी समस्त हिंदू समाजाने आता जाती-पातीत न विभागता ‘हिंदू धर्म’ म्हणून एकत्र येण्याची वज्रमुठ आवळली पाहिजे, असे जाहीर आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.वेळापूरमधील संबंधित कुटुंबावर झालेल्या या अन्यायाविरोधात संपूर्ण हिंदू समाज पाठीशी उभा राहणार असून, मुलीचा छडा लावून तिला सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.असे ते म्हणाले.आपल्या शांतताप्रिय भागात अशा प्रकारच्या घटना वाढणे चिंताजनक आहे. तरुण मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत.जोपर्यंत हिंदू समाज वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेला राहील, तोपर्यंत अशा प्रवृत्तींचे धाडस वाढत राहील. त्यामुळे आता जातीच्या भिंती तोडून फक्त आणि फक्त ‘हिंदू’ म्हणून संघटित होण्याची वेळ आली आहे.

न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही 

आपल्या बहिणी-मुली सुरक्षित ठेवायच्या असतील, तर गाफील राहून चालणार नाही. वेळापूरची घटना ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या हिंदू कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. परिसरातील प्रत्येक हिंदूने या अन्यायाविरोधात एकत्र यावे.

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील ( प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र जनसेवा संघटना)

या घटनेची माहिती पसरताच वेळापूर आणि परिसरात हिंदू बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी आणि मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. आगामी काळात या प्रकरणी हिंदू समाजाकडून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button