महावितरण मधील तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक कर्मचारी यांचा सन्मान

महावितरण मधील तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक कर्मचारी यांचा सन्मान
संचार वृत्त
अकलूज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आषाढी वारी दरम्यान अहोरात्र सेवा बजाविलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रेस पत्रकार सेवा संघ व भारतीय दलित संसद संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राध्यापक व सुप्रसिद्ध सामाजिक प्रबोधनकार महालिंग सावळजकर व शशिकांत कडबाने यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी, आषाढीवारी निमित्त संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज मध्ये मुक्कामाला असते. या काळात वीज खंडित होऊ नये यासाठी तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरणच्या तारांमध्ये अडकून वीज खंडित होऊ नये यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अडथळे आणणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून वीज तारा व्यवस्थित करण्याचे काम अहोरात्र व प्रामाणिकपणे करणार्या कर्मचाऱ्यांचा दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या आयोजित केली असल्याचे सांगितले. यावेळी प्र. तंत्रज्ञ महादेव पिसे, मुख्य तंत्रज्ञ बाबुराव जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञान नितीन घुरे, अनुदित कांबळे, रमेश लवटे, समीर सोनटक्के, रोशन मालवे, विद्युत सहाय्यक सुनील बनसोडे बाह्यस्तोत तंत्रज्ञ सूर्यकांत साठे, अक्षय जैन, केतन शिंदे उमेश जाधव शहाजान शेख शितल पताळे यांचा सन्मान करण्यात आला.
महावितरणमधील तंत्रज्ञ व विद्युत सहाय्यक कर्मचारी ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा देत असतात. विना खंडित सेवा देण्यासाठी अहोरात्र केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा पत्रकार सेवा संघ सन्मान करीत आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे कार्य हे कौतुकास्पद कार्य असल्याचे मत प्रा सावळजकर यांनी व्यक्त केले.